‘आप’मध्ये इनकमिंगचा ओघ सुरूच.;आयआयटी असोसिएशनचे माजी महासचिव मस्तान तांबावाला यांचा प्रवेश

मुंबई :  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ मध्ये एंट्रीचा ओघ सुरूच आहे. आयआयटी असोसिएशनचे माजी महासचिव मस्तान तांबावाला यांनी आज पक्षात प्रवेश केला. आयआयटी कानपुरमधून पदवी घेतलेल्या तांबावाला यांचा कॉर्पोरेट क्षेत्रात असलेला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची पक्षाच्या थिंक टॅंक, रणनीती तसेच आऊटरीच आणि प्रचार यंत्रणा उभी करण्यात मदत होणार आहे.

तांबावाला हे आंतरराष्ट्रीय कोचिंग  फेडरेशन सर्टीफाईड कोच असून मल्टिनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सामाजिक कार्यात अनेक वर्षे सक्रिय राहत आता त्यांनी ‘आप’च्या माध्यमातून बदलाच्या राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
“दर्जेदार नागरी सुविधांच्या माध्यमातून ‘आप’ने केलेल्या गुड गव्हर्ननन्स मुळेच तांबावाला यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’ ने उभे केलेल्या विकासाच्या मॉडेलकडे मुंबईकर मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. बरेच महत्वाच्या व्यक्ती आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहेत.

‘आप’ हा फक्त एक राजकीय पर्याय नसून तो समस्यांवर उपाय शोधणारा पक्ष आहे. 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय बदल नक्कीच घडेल असा आम्हाला विश्वास आहे” असे मत मुंबई महापालिका निवडणुक प्रभारी व ‘आप’ नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.

Social Media