आशियातील श्रीमंत मुंबई महापालिकेला कोरोना निवारण्यासाठी बँकेच्या ठेवींमधून खर्च भागविण्याची वेळ! 

मुंबई : कोरोना संकटामुळे आशियातील श्रीमंत महानगरपालिका असा लौकीक असणा-या मुंबई महापालिकेला जनतेच्या हितासाठी कोरोना संकट निवारण्यासाठी बँकेत असलेल्या ठेवींमधून खर्च भागविण्याची वेळ आली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च महसुली उत्पन्न असणा-या महापालिकेच्या उत्पन्नात यंदा प्रथमच प्रचंड तूट निर्माण झाली आहे.

परिणामी मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागत आहे. कोरोना संकटाशी दोन करताना सुमारे तेराशे कोटी रुपयांवर खर्च करण्यात आला आहे. ज्यापैकी नऊशे कोटी रुपये हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत.तर उर्वरीत निधीसाठी बँकेतील ठेवींना हात घालावा लागला आहे. मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने यंदा चौदाशे कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे. जमेची बाजू म्हणजे राज्य सरकारने कोरोना संकटासाठी मुंबई महापालिकेला हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे.

Social Media