मुंबई : कृषी कायद्याच्या विरोधकांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. ‘देशात झालेल्या विविध निवडणुका-पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे केंद्रातील विरोधी पक्ष हादरले आहेत. म्हणून आता शेतकरी आंदोलनला पाठिंबा देत आहेत.’ असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेत्यांना या कायद्याच्या विरोधात टीका करणाऱ्यांना राजकीय अलमायझर झाला आहे का? कपिल सिब्बल यांनी तर संसदेत २०१३ ला जोरदार भाषण केले होते. शरद पवारांनी याच कायद्याच्या अनुषंगाने पत्र लिहिले होते.’ असे प्रश्न मुनगंटीवार म्हणाले.
‘जर केंद्राचा कायदा अडचणींचा वाटत आहे तर राज्यात तुम्हाला सोईचा होईल असा कायदा करावा. आम्ही २०१४ नंतर राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले त्यामुळे कुठे नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही.’ असे देखील त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.