केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयीन कर्मचा-यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत ५० टक्के चक्राकार पद्दतीने उपस्थितीचा आदेश निर्गमित!

मुंबई दि. ३ : केंद्र सरकारने ओमायक्रॉनसह कोविड-१९च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या उपसचिव दर्जापेक्षा वरच्या अधिका-यांना वगळून अन्य सर्व कार्यालयीन कर्मचा-यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत ५० टक्के चक्राकार पद्दतीने उपस्थितीचा आदेश तातडीने उद्या (दि ४) पासून लागू केला आहे.

दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिला अधिका-यांना वगळले

या संदर्भात आदेशात म्हटले आहे की उपसचिव आणि त्यावरच्या दर्जाच्या अधिका-यांना केवळ रोज कार्यालयात हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिला अधिकारी यांना वगळण्यात आले आहे. कार्यालयात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ९ ते पाच आणि दहा ते साडे सदा अश्या वेगवेगळ्या वेळांना हजेरी लावायची आहे जेणे करून जाता येतना गर्दी होणार नाही. या मध्ये कंटेनमेंट झोन मध्ये राहणा-या अधिका-यांना कार्यालयात येण्यापासून वगळण्यात आले आहे. जे कर्मचारी, अधिकारी कार्यालयात न येता घरून काम करत आहेत त्यांनी कार्यालयीन वेळात फोन अथवा अन्य साधनांव्दारे संपर्कात राहणे आवश्यक आहे. कर्मचा-यांनी कोविड-१९ सुलभ वर्तन वारंवार हात धुणे, मास्क आणि सुरक्षीत अंतर पाळणे इत्यादी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे असे यासंदर्भात निर्गमित आदेशात म्हटले आहे.

Social Media