मुंबई : पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रवाशांना बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल. कारण गणेशोत्सव आणि राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून राज्यात एसटीची लालपरी वाहतूक, आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नाही.
त्यामुळे राज्यातील नागरिकांना सह कोकणातील गणपती सणासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची धाव २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली होती. गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे.