दंडात्मक कारवाई ची रक्कम पोलीस कल्याण निधीला 

मुंबई : मुंबईत कोविडच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक आहे. पण याचे पालन होत नसल्याने सध्या क्लीन-अप मार्शलच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत असली तरी त्यांच्या मदतीला आता पोलिस दिले आहेत. अशाप्रकारे मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना दिले असून, पोलिस जो दंड घेतील, त्यातील ५० टक्के रक्कम महापालिकेला मिळेल आणि ५० टक्के रक्कम पोलिस कल्याण निधीसाठी देण्यात येईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

 

लोकल प्रवास हेही एक कारण

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमांमधून तसेच लग्न समारंभांमधून कोरोना जास्त फैलावला असल्याचे सांगितले. वाढत्या रुग्णसंख्येला लोकल प्रवास हेही एक कारण आहे. सध्या आढळून येणारे ८२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. पण उर्वरित १८ टक्के रुग्ण हे लक्षणे असलेले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करावा लागत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर आणि बेडस् पुरेसे आहेत. आधीप्रमाणेच प्रोटोकॉल पाळला जाईल. सध्या असलेल्या रुग्ण खाटा, आयसीयू बेड तसेच इतर बेड्सच्या एकूण २५ टक्के बेड्स भरलेले असून, उर्वरित ७५ टक्के उपलब्ध आहेत.

बहुतांश रुग्ण हे इमारतीसह उच्चभ्रू वस्तीतील असून झोपटपट्टी तसेच दाटीवाटीच्या भागातील नाहीत. नियमांचे पालन केले तर लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. सध्यातरी संचारबंदीचा विचार अजेंड्यावर नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

Social Media