पंतप्रधानाकडे मदतीसाठी आग्रह धरला तरच फडणवीस जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल : नवाब मलिकांची फडणवीसांना गुगली

मुंबई  : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जास्तीत जास्त मदत देण्याचा आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, असा गुगली टाकत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

प्रशासन नुकसानीचा अंदाज घेत आहे(The administration is estimating the damage)

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच. परंतु, फडणवीस महाराष्ट्रा सोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे. नवाब मलिक म्हणाले की, राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन कोकणातील नुकसानीचा अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्यसरकारची भूमिका असेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत(BJP leaders are being rescued)

देवेंद्र फडणवीस केंद्रसरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मात्र आग्रह धरत नाहीत. राज्यसरकार काय देणार यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, असा टोला मलिक त्यांनी लगावला. फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावे, असा थेट सवालही त्यांनी केला. मलिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला १ हजार कोटीचे पॅकेज दिले. जनता प्रश्न निर्माण करू लागल्यावर आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही भरपाई देणारच आहोत पण आधी फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

Opposition leader Devendra Fadnavis should urge Prime Minister Narendra Modi to provide maximum assistance. If he does so, it will prove that he is with the people of the state, NCP spokesperson Nawab Malik has challenged Devendra Fadnavis.


मोठ्या महानगरात रूग्णसंख्या घटली –

निम्या राज्यात कोरोना रूग्णसंख्येत निर्बंध असूनही वाढ; रूग्णांना गृह विलगीकरणात न ठेवण्याचा महसूल मंत्र्याच्या आढावा बैठकीत निर्णय!

Social Media