पुणे, दि. 1 :-कोरोना साथ रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेल्या प्राथमिक शाळांची घंटा आज प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाजली आहे.राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आज पासून सुरू झाले असून शाळा प्रशासना कडून यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरी भागातील काही ठिकाणी मात्र 10 किंवा 15 डिसेंबर पासून हे वर्ग सुरु होणार आहेत.
शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी शाळा प्रशासना कडून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी अनेक दिवसा नंतर शाळेत जायला मिळणार याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
कोरोना विषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी यावेळी शाळा प्रशासना कडून करण्यात आली.नव्याने येऊ घातलेल्या साथ रोगाचा धोका टाळून शाळा कायमस्वरूपी सुरू राहावी अशी अपेक्षा विद्यार्थी व शिक्षकां कडून व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर , औरंगाबाद , नाशिक , पुणे आदी महानगरात येत्या 10 डिसेंबर पासून तर मुंबई महानगर प्रदेशातील प्राथमिक शाळा येत्या 15 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.