मुंबई दि 24 — विलीनीकरणा चा हट्ट सर्वच धरून ठेवला तर ते अडचणीचं होईल , योग्य पगार मिळावा ही मागणी योग्य मात्र प्रवाश्यांना त्रास होतोय हे लक्षात घेणं गरजेचं. भविष्यात विलीनीकरण होईल ही बाब एस टी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावी अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.
विरोधी पक्षाने काल उपस्थित केलेल्या राज्यातील विविध प्रश्नावरच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देत होते.
विदर्भ आणि मराठवाड्यावर आम्ही बिलकुल अन्याय केला नाही उलट तुमच्याच काळात मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय केला होता हे आकडेवारी देत पवार यांनी स्पष्ट केले.
Ndrf च्या निकषांबाहेर जाऊन आम्ही नैसर्गिक आपत्ती त सापडलेल्या राज्यातील जनतेला मदत केली असं सांगून राज्यातील तिजोरीवर विपरीत परिणाम झाला असता म्हणून च पेट्रोल डिझेल वरचे कर आम्ही कमी केला नाही असं पवार म्हणाले.
मद्य करचोरी वर आळा घालण्यासाठीच विदेशी मद्यावरचा कर कमी केला आहे , मराठवाडा वॉटर ग्रीड ची आपली योजना चुकीची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, आम्ही ही योजना बंद केलेली नाही. केंद्राकडून 31 हजार 624 कोटींची रक्कम येणं अद्याप बाकी आहे असं उपमुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान पीक विमा योजनेत आपल्यासह केवळ 17 राज्यच आहेत , या योजनेत जास्त हप्ता द्यावा लागतो मात्र विमा परतावा प्रत्यक्षात कमी मिळतो, यामुळे या योजनेत सहभागी व्हायचं की नाही यावर गंभीरपणे विचार करायला हवा आहे असंही पवार यांनी सांगितले.