मुंबई : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील काही मोजक्याच रस्त्यांवरील पदपथावर ग्लास फायबर रेलिंग व बोलार्ड बसवण्यासाठी निविदा मागवल्या. विशेष म्हणजे तिन्ही भागांसाठी एकच कंपनी पात्र ठरली असून, तिन्ही भागांसाठी प्रत्येकी ४१ कोटी १४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे ४८ रस्त्यांवरील पदपथांवर हे रेलिंग व बोलार्ड बसवण्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, डोळयांसमोर हा एवढा अनाठायी खर्च दिसूनही विरोधी पक्ष आणि पहारेकरी यांनी शिवसेनेला साथ देत प्रस्ताव मंजूर करण्यास मदत केली.
मुंबई पोलिस आयुक्त व सहपोलिस आयुक्त यांच्याकडून महापालिका आयुक्तांना आलेल्या पत्राचा हवाला देत प्रशासनाने या कामासाठी निविदा मागवत कंत्राटदाराची निवड केली आहे. रस्त्यावरील पदपथावर सुंदर आणि टिकाऊ रेलिंग व बोलार्ड बसवण्यासाठी मागवलेल्या या निविदांमध्ये दोषदायित्व १० वर्षे असल्याने, याचा खर्च दुप्पट असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या निविदेमध्ये शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या तिन्ही भागांसाठी स्वतंत्र निविदा मागवूनही तिन्ही ठिकाणी शांतीनाथ रोडवेज ही एकमेव कंपनी पात्र ठरली.
यामध्ये शहर भागातील ३० रस्ते, पूर्व उपनगरातील ६ रस्ते आणि पश्चिम उपनगरातील १२ रस्त्यांचा समावेश आहे. विविध ठिकाणी रस्त्यांची संख्या वेगवेगळी असतानाच, प्रत्येक भागांसाठी प्रत्येकी ४१.१४ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या निविदा सप्टेंबर २०१९मध्ये मागवण्यात आल्या होत्या. या निविदेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावर आक्षेप नोंदवल्यामुळे तर पुढे कोविडमुळे, या निविदांबाबतचा मसुदा अंतिम करण्यात येत नव्हता. पण हा प्रस्ताव घाईघाईत आणून प्रशासनाने मंजूर करून घेत, एकाच कंत्राटदारावर १२५ कोटींची उधळण करत आवश्यक नसलेल्या कामांसाठी खर्च करण्याचा मार्ग मोकळा केला.
मुंबई शहर :
लोकमान्य टिळक मार्ग (क्रॉफर्ड मार्केट ते मेट्रो सिनेमा )
काळबादेवी रोड (काळबादेवी जंक्शन ते सुरती हॉटेल )
मोहम्मद अली रोड (बाबुराव शेटये चौक ते पायधुनी )
सेनापती बापट मार्ग (यादव चौक ते बाळकृष्ण गावडे चौक/ वडाचा नाका)
शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल ते लोहार चाळ)
दादासाहेब फाळके रोड (हिंदमाता मार्केट ते दादर रेल्वे स्टेशन पूर्व)
सुंदरमहल जंक्शन ते एन.सी.पी.ए.. एन.एस. मार्ग, मरीन ड्राइव्ह,
हजारीमल सोमानी मार्ग (उत्तर दिशा) दोन्ही बाजुकडील सर्व पदपथ – ओ.सी.एस. जंक्शन (बॉम्बे जिमखाना पदपथ ते सी.एस.एम.टी. स्टेशन)
महापालिका मार्ग (उत्तर ते दक्षिण दिशा) सी.एस.एम.टी. जंक्शन ते मेट्रो जंक्शन
डी.एन. रोड (उत्तर ते दक्षिण दिशा) सी.एस.एम.टी. जंक्शन ते मेट्रो जंक्शन
एम.के. रोड- सैफी हॉस्पीटल ते चर्चगेट रेल्वे स्टेशन (उत्तर ते दक्षिण दिशा) गांधी मार्ग (प्रीन्स स्ट्रीट पूल) (उत्तर ते दक्षिण दिशा)
बाबुलनाथ मंदिर जंक्शन ते आयआयटी जंक्शन
सदानंद हॉटेल ते चकाला जंक्शन (उत्तर ते दक्षिण दिशा) चकाला जंक्शन ते साबुसिद्दीकी जंक्शन (उत्तर ते दक्षिण दिशा)
के. के. रोड- महालक्ष्मी रेसकोर्स गेट नं. ७ ते हाजीअली जंक्शन सबवेपर्यत
डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग ( पेडर रोड) महालक्ष्मी मंदिर ते विला टेरेसा जंक्शन
डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) कृष्णा संघिल ते सिशिल जंक्शन
डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) आर.टी.आय. जे ते बाबुलनाथ मंदिर जंक्शन
भूलाबाई देसाई मार्ग – महालक्ष्मी मंदिर जंक्शन ते तल्याराखान जंक्शन
सेनापती बापट मार्ग, वडाळा नाका ते यादव चौक
गणपतराव कदम मार्ग. यादव चौक ते वरळी नाका
मिर्झा गालिब रोड, (क्लेअर रोड)- क्रीश चर्च स्कुल ते नागपाडा जंक्शन
बेलासिस रोड- अरेबिया जंक्शन महाराष्ट्र कॉलेज
शांतीनगर सिग्नलजवळ
भवानी शंकर रोड – (दादर रेल्वे स्टेशन पश्चिम ते खेडगल्ली जंक्शन)
सायन- वांद्रे लिक रोड धारावी जंक्शन ते पिवळा बंगला, वाय जंक्शन से धारावी डेपो रोड कचरपटटी जंक्शन (पदपथ व दुभाजक)
एल.बी.एस. मार्ग कचरपटटी जंक्शन सायन स्टेशन (पदपथ व दुभाजक)
९० फूटी रस्त्यावरील कुंभारवाडा जंक्शन ते संत रोहिदास मार्ग
६० फूटी रस्त्यावरील धारावी कॅम्प (खेमकर चौक) ते कुभारवाडा जंक्शन
शामलदास गांधी मार्ग – प्रीन्सेस स्ट्रीट पूल (उत्तर ते दक्षिण दिशा)
प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांच्या आदेशानुसार शहरातील आणखी कुठलेही रोड व पदपथ
पश्चिम उपनगरे :
सांताक्रुज (प) स्टेशनजवळील टिळक रोड येथील दोन्ही बाजूस
जुहू तारा रोडच्या उत्तर बाजूजवळील नाला गजहरबंध वरील फूटपाथ
इर्ला मार्केट येथील इर्ला लेन येथील दोन्ही बाजुच्या पदपथावरील रस्ते
दादासाहेब मार्गावरील एस.व्ही. रोड जंक्शन ते कॅप्टन गोरे पूल
जुहू चौपाटीवरील उत्तर बाजू
मिठीबाई जंक्शन येथील दोन्ही बाजूंचे पदपथ ते एस.व्ही.मार्गावरील बुटटा चौकच्या समोरील व्ही.एम.रोड
मिरा टॉवर जंक्शन ते न्यु लिंक रोड इंडियन ऑईल जंक्शन
अंधेरी पश्चिम मुंबई येथील जय प्रकाश रोड मुख्य चार बंगला, सात बंगला ते सिझर रोड जंक्शन, गार्डन कोर्ट जंक्शन
अंधेरी सब वे येथील दोन्ही बाजुचे पदपथ ते एस.व्ही. रोड राम झरोका सोसायटी
डॉन बॉस्को जंक्शन ते चंदावरकर लेन ते एस. व्ही. रोडवरील दोन्ही बाजुंचे पदपथ
गोरा गांधी हॉटेल ते एस.व्ही. रोड पोईसर डेपो
प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांच्या आदेशानुसार पश्चिम उपनगरातील आणखी कुठलेही रोड / पदपथ
पूर्व उपनगरे :
एव्हरार्ड नगर ते अमर महल पूल पूर्व द्रुतगती मार्ग येथील महा दुभाजक
व्ही. एन. पुरव मार्ग( चेंबुर नाका जंक्शन ते सुमन नगर जंक्शन)
ओम एम.जी.रोड अमर महल जंक्शन ते शंकर जंक्शन
मानखुर्द टी जंक्शन ते मानखुर्द स्टेशन दक्षिण
मानखुर्द टी जंक्शन ते पी.एम.जी.पी. सिग्नल येथील सर्व बाजूचे पदपथ
प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांच्या आदेशानुसार पूर्व उपनगरे मधील आणखी कुठलेही रोड / पदपथ