म्हाडा मुख्यालयात पहिल्या दिवशीच ५ अभ्यांगत आढळले कोरोना बाधित; मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची होणार चाचणी

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता बृहन्मुंबई महानगर पालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल, सिनेमा गृहात प्रवेश करतेवेळी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) प्रशासनातर्फे वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांची मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून म्हाडा मुख्यालयात आज आलेल्या १८२ अभ्यांगतांपैकी ५ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

म्हाडा हे एक लोकाभिमुख कार्यालय असल्याने सरासरी दररोज सुमारे दोन हजार नागरिक म्हाडा कार्यालयास भेट देतात. त्यामुळे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार म्हाडास भेट देणाऱ्या अभ्यांगतांची कोरोना चाचणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. अपूर्व लॅब आणि जनहित डायग्नोस्टिक या लॅबोरेटोरीज मार्फत ही चाचणी करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना कलिना कॅम्प येथील कोरोना हेल्थ केअर सेन्टरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या इमारतीत अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, बँक आणि न्यायालय असल्याने गृहनिर्माण भवनात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच कोविड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जनजागृती करणारी भित्तीपत्रके म्हाडा मुख्यालयात तसेच विभागीय मंडळांच्या कार्यालयात लावण्यात आले असून कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालय व म्हाडाचे राज्यातील विभागीय मंडळांमधील स्वच्छता गृहांमध्ये तथा प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वच्छताविषयक सामुग्री (सॅनिटायझर्स) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोरोना चाचणीमुळे प्रवेशद्वाराजवळ होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, सर्व संबंधितांनी याकामी सहकार्य करावे. म्हाडातर्फे लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत ई – मित्र कार्यप्रणाली मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

In view of the daily increase in the number of corona patients in Mumbai, the Brihanmumbai Municipal Corporation has made corona testing mandatory when entering malls, cinema houses to prevent the outbreak of corona virus. Against this backdrop, the Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) administration has decided to conduct free corner testing of the candidates coming to Mhada headquarters in Bandra East and five of the 182 candidates who came to mhada headquarters today have been found to be korona positive.

Social Media