मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष सर्वाधिक जागांवर विजयी झाला आहे. ममता यांच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
जनतेच्या स्वाभिमानाचा एकाकी लढा(The lonely fight for the pride of the people)
“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
आपली ताकद सिद्ध करुन दाखवली(Proved strength)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी देखील या विजयावर व्टिट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणूकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपली ताकद सिद्ध करुन दाखवली आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जींचे खास कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी व्टिट मध्ये ममतांचे अभिनंदन केले आहे.
विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल(The torch of victory will shine across the country)
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. “एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल,” असे संजय राऊत म्हणाले.
Chief minister Uddhav Thackeray has congratulated Trinamool Congress president Mamata Banerjee. Mamata Banerjee’s party has won the highest number of seats in the West Bengal assembly elections. Maharashtra chief minister Uddhav Thackeray congratulated Mamata after her victory.