चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात(Tadoba-Andhari Tiger Reserve) मोठी घटना घडली असून व्याघ्र गणना जाणारी महिला कर्मचारीच वाघाने केलेल्या हल्ल्यात ठार झाली आहे. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वाघाच्या या हल्ल्यात महिला वनरक्षक स्वाती ढुमणे वय 43 ठार झाली आहे.ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष 97 ची घटना आहे. सोबत असलेल्या 4 वनमजुरांनी वाघाला हुसकाविण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला, वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले वरिष्ठ अधिकारी -अधिक कुमक आल्यावर शोधमोहिमेत मृतदेह सापडला. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने ही पूर्वतयारी केली जात आहे .