अभिनेता संजय दत्तला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी 8 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज सोमवार 10 ऑगस्ट रोजी संजयला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

प्रसिद्ध छायाचित्रकार विराल भयानी यांनी संजय दत्तला डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे फोटो समूह संपर्क माध्यमावर सामायिक केले आहेत. संजय दत्त ने ट्वीट करत त्याच्या तब्ब्येतीबाबत सांगितले होते.

Social Media