मुंबई, दि. 14 : महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकवर आधारित चित्रपटाचा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार सुशांतच्या सेवकाने या घटनेची माहिती पोलिसांना प्रथम दिली.
सुशांतने बॅकअप डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. टीव्हीवर त्याची पहिली मालिका बालाजी टेलीफिल्म्स ‘किस देश में है मेरा दिल’ होती. यात त्याने प्रीत जुनेजाची भूमिका साकारली होती. यानंतर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. सुशांतसिंग राजपूत यांचा जन्म पाटण्यात झाला. 2000 च्या सुरुवातीस त्याचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. सुशांतला 4 बहिणी आहेत. त्यातील एक राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे.
सुशांतने आपल्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आईची आठवण केली होती. 3 मे रोजी ही पोस्ट केली होती. दुसरीकडे, 2019 च्या ‘छिछोरे’ या चित्रपटात सुशांतने एका वडिलांची भूमिका साकारली आहे. ज्यात तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या त्याच्या मुलावर मात करण्यात अपयशी ठरल्याची स्वतःची आणि मित्रांची कथा आहे.