अमित ठाकरे रुग्णालयातून घरी; १४ दिवस होम क्वॉरंटाईन राहणार

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray)लिलावती रुग्णालयातून घरी परतले आहेत. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना घरीच होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

चार दिवसातच डिस्चार्ज(Discharge within four days)

अमित ठाकरे(Amit Thackeray) यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने त्यांना चार दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांना १४ दिवस घरीच क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. कोरोनामुळे पक्षाचे कार्यक्रम बंद असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी होत होत्या.अमित ठाकरे यांना सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
MNS president Raj Thackeray’s chiranjeev and youth leader Amit Thackeray have returned home from the auction hospital. He was admitted to the hospital after being infected with corona. Doctors have now advised them to stay home quarantined at home.

Social Media