इरफान खानचा ‘वारसा’ पुढे नेण्याचा शूजित सरकारचा निर्णय, बाबिलसोबत चित्रपट बनवण्याची तयारी….

मुंबई : २०१५ मधील चित्रपट पीकू (Piku) मध्ये दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत (Irrfan Khan) काम केल्यानंतर दिग्दर्शक शुजित सरकार (Shoojit Sircar) आणि निर्माता रॉनी लाहिरी(Ronnie Lahiri) यांनी दिग्गज अभिनेत्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी त्यांनी इरफान खानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) बरोबर हातमिळवणी केली आहे. यासंबंधी रॉनी लाहिरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या गोष्टीची पुष्टी केली आहे. रॉनी लाहिरी यांनी काही छायाचित्रे देखील सामायिक केली आहेत, ज्यामध्ये ते शुजित सरकार आणि बाबिल खानसह दिसून येत आहेत.

आपल्या प्रोजेक्टची एक झलक दाखवताना, त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यांच्या अगामी प्रोजेक्टसंदर्भात आनंद व्यक्त केला आहे. पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की, ‘तुमची विरासत पुढे घेऊन जाण्याबद्दल मला आनंद वाटत आहे इरफान सर. पूर्वी तुमच्या सारख्या दिग्गजाबरोबर आणि आता बाबिलसोबत काम करत आहोत.’ तथापि या प्रोजेक्टसंदर्भात कोणत्याही प्रकारची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

परंतु, रॉनी लाहिरी यांच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की ते दिवंगत अभिनेता इरफान खानच्या मुलासोबत काम करण्यास खूप उत्साही आहेत. बाबिलसाठी २०२० हे वर्ष सोपे नव्हते. गेल्या वर्षी बाबिलने वडिलांना गमावले तर बॉलिवूडने एक उत्तम अभिनेता.

बाबिल त्याच्या वडिलांच्या अगदी जवळ होता. बाबिलचा सोशल मीडिया अकाउंट दिवंगत अभिनेता इरफान खानच्या पोस्ट ने भरला आहे आणि तो बरेचदा त्यांच्या नात्याबद्दल अनेक किस्से सामायिक करत असतो. काही दिवसांपूर्वी, त्याने वडिलांची काही छायाचित्रे सामायिक केली होती आणि त्यासोबत एक भावनिक कॅप्शन लिहिले होते की, ‘मी इतकी मेहनत करीत आहे जर तुम्ही याचे साक्षीदार असतात. ’
Shoojit Sarkar engaged in taking forward Irrfan Khan’s ‘legacy’, will make a film with actor’s son Babil

Social Media