मुंबई : महापालिका क्षेत्रात कोविड १९ लसीकरण मोहीम उद्या दिनांक १९ जानेवारी २०२१ पासून महापालिकेने निश्चित केलेल्या ९ केंद्रांवर नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ववत सुरू होत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे लसीकरण करण्यात येणार आहे.कोविड लसीकरण मोहिमेसाठी आता संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करून पुनश्च लसीकरण सुरू होत आहे.
या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, निम वैद्यकीय कर्मचारी असे पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. कोविड-१९ ॲप मध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण सुरू झाल्यासंदर्भात महानगरपालिकेच्या विभागस्तरीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून देखील वैयक्तिक संपर्क करून संदेश देण्यात येत आहेत. महानगरपालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणा यासाठी सुसज्ज व सतर्क असून पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दक्ष आहे.