मुंबई : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधनने नितीशकुमार आणि एनडीएवर प्रचंड टीका केली मात्र त्यांना बिहार च्या जनतेने नाकारले असून एनडीए ला स्पष्ट बहुमत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी; मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप चे सुशीलकुमार ; देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी मेहनत घेऊन प्रचार केला.
बिहार च्या विकासासाठी जनतेने एनडीए ला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा संधी दिल्याबद्दल बिहार च्या जनतेचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी हार्दिक आभार मानले आहेत.