बुलढाणा : कर्तव्यावर असताना एखाद्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झालं तर अशा पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत सरकारकडून देण्यात येईल.. मात्र त्यासाठी कलेक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा जिल्हयात माध्यमांशी बोलताना केली होती. चित्रफीतीमध्ये घोषणा करताना राजेश टोपे दिसत आहेत.