किसान आंदोलनात मोदी.. कोशियारी वर पवारांचा थेट हल्लाबोल…

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे.. शेतकऱ्यांना भेटणे हि नैतिक जबाबदारी नाहीं का? पवारांचा राज्यपालांना थेट सवाल…

मुंबई :   मुंबईतील  आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलकांसमोर बोलताना राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना थेट उल्लेख करून कंगना ला भेटायला वेळ आहे, शेतकऱ्यांना भेटण्याची नैतिक जबाबदारी नाहीं का? असा जाहिर सवाल केला आहे,मुंबई तील  आझाद मैदान येथे राज्य भरातून आलेल्या आंदोलक शेतकऱ्यांसमोर ते बोलत होते, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या सारखा राज्यपाल या राज्यात कधीच पहिला नाहीं असे सांगून पवार म्हणाले की शेतकरी आंदोलनातील  नेत्यांनी वेळ मागितल्या नंतरही राज्यपाल गोव्याला निघून गेले, कंगना राणावत ला भेटायला हेच राज्यपाल वाट पाहत थांबतात परंतु पायी चालत आलेल्या शेतकऱ्यांना सामोरे जाण्याची नैतिकता दाखवत नाहीत, या पेक्षा अधिक दुर्दैवी गोष्ट काय असु शकेल? असे सांगून पवार म्हणाले की राज्यपालांच्या या वर्तनावर मला अधिक बोलता येत नाहीं..

शरद पवार यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला 60दिवस झाले आणि अनेक शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला तरी या कष्टकऱ्यांबाबत देशाची सत्ता ज्यांच्या कडे आहे त्या पंतप्रधानी साधी चौकशी केली नाहीं असा थेट हल्ला केला.. शरद पवार म्हणाले की पंजाब, हरियाणा आणि पश्चिम, उत्तर प्रदेश मधले शेतकरी या देशाचे नागरिक आहेत, पाकिस्तान चे नाहीं, जालीयन वाला बाग सारख्या घटनेत देशासाठी याच पंजाब च्या शेतकऱ्यांनी प्राण दिले आहेत, दीडशे कोटी जनतेचा अन्न दाता ज्या भागात राहतो, त्यांच्या बद्दल सत्ताधाऱ्याना आस्था नाहीं..

पवार म्हणाले की ही कृषी सुधारणा विधेयके 2003पासून चर्चेत आहेत मात्र भाजपा च्या राजवाटीत  घाई ने चर्चा न हि विधेयके  मंजूर   करण्यात आली, त्यावेळी राज्यसभेत विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित हि विधेयके संयुक्त चिकित्सा समिती कडे पाठवण्याचा आग्रह धरला मात्र तो देखील मान्य करण्यात आला नाहीं हा घटनेचा अवमान आहे, बहुमताच्या बळावर जरी कायदे मंजूर केलें तरी हि कष्टकरी जनता तुम्हाला या कायद्यासह उध्वस्त करून धडा शिकवेल असा इशारा त्यांनी दिला..

पवार म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला 1942 मध्ये निर्णायक वळण मुंबई च्या कष्टकऱ्यांनी दिले, त्या नंतर 1955ते 57या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई, महाराष्ट्रातील कष्टकरी रस्त्यावर उतरले, हे कष्टकरी या सत्ताधारी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असे पवार म्हणाले..

Social Media