केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव, १४ प्रकरणांनंतर हाय अलर्ट जारी…

तिरूवनंतपुरम (केरळ) : केरळ मध्ये कोरोना साथीच्या प्रादुर्भावादरम्यान आता झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. एका गर्भवती महिलेसह १४ लोकांना डासांमुळे होणाऱ्या विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही पहिलीच घटना आहे जेव्हा केरळ मध्ये झिका विषाणूचे प्रकरण समोर आले आहे. तर, केरळ मध्ये झिका विषाणूची वाढती प्रकरणे पाहता शेजारील कर्नाटन राज्याने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यातील आरोग्य विभागाने झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला आहे. एका पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, तिरूवनंतपुरम जिल्ह्यातून पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) मध्ये पाठविलेल्या १९ नमुन्यांपैकी १३ नमुने झिका सकारात्मक आढळून आले आहेत.

 

जॉर्ज यांनी सांगितले की, हे १३ संक्रमित रूग्ण तिरूवनंतपुरम च्या खासगी रूग्णालयात काम करणारे आरोग्य कर्मचारी आहेत. ते सर्वजण शहरातील रूग्णालयाशेजारी राहत होते. शहरातील ते क्षेत्र आणि त्यांच्या प्रवासाचा इतिहास तपासल्यानंतर तातडीने कारवाई केली जाईल. याव्यतिरिक्त, एका २४ वर्षीय महिलेला आदल्या दिवशी एका तपासणीत या आजाराचे निदान झाले होते यासोबतच १४ लोकांमध्ये या आजाराची पुष्टी झाली.

 

कृती आराखड्यासंदर्भात सांगताना त्यांनी म्हटले की, ‘त्या ठिकाणांवर आणि रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करुन कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, जेथे संसर्ग होण्याची शक्यता आहे. डास नियंत्रण सर्वात महत्वपूर्ण आहे. विविध विभागांकडून समन्वयात्मक कारवाई केली जाईल.’ आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, सर्व जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि सध्या घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही.

 

त्यांनी सांगितले की, सर्व रूग्णालयांनी सतर्क राहिले पाहिजे. झिका विषाणूसंदर्भात माहिती देणाऱ्या प्रयोगशांळांची सुविधा वाढविली जाईल. वैद्यकीय महाविद्यालयांच्या बाहेरील प्रकरणांचीही सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. याशिवाय जनजागृती मोहीम राबविली जाईल. त्यांनी ताप, डोकेदुखी, शरीरिक वेदना किंवा लाल डाग यासारखी लक्षणे असलेल्या लोकांना त्वरित उपचार करण्यास आणि आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले.

Zika virus outbreak in Kerala, alert issued after 14 cases; Neighboring states also alert

Social Media