मुंबई : कोरोना संक्रमणामुळे बंद पडलेल्या शाळा सप्टेंबर महिन्या मध्ये सुरू होऊ शकतात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की परिस्थिती सुधारली तर शाळा सुरू होऊ शकतात मात्र सरकार घाई करणार नाही. एका विशेष भेटी दरम्यान त्या बोलत होत्या. शिक्षण मंत्री म्हणाल्या सध्या ३१ ऑगस्ट पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत, यानंतर केंद्र सरकार काय भूमिका घेते हे आधी पाहू, मुलांच्या शाळेचे नुकसान होऊ नये हा विचार आम्ही करतो पण मुलांचे आरोग्य सांभाळणे हे प्राधान्य आहे, यासाठी कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये शाळा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे.
गायकवाड़ म्हणाल्या की यासाठी शाळांची तपासणी देखील झाली आहे. आधी नववी दहावी आणि बारावी असे वर्ग सुरू केले जातील, दुसरा टप्प्यात सहावी ते आठवी, आणि अंतिम टप्प्यात पाचवी ते पहिली असे वर्ग सुरू केले जातील, साधारणपणे दरवर्षी १५ जून पासून शाळा सुरू होतात मात्र यावर्षी कोणाला संक्रमणामुळे अजूनही वर्ग सुरू झालेले नाहीत. गायकवाड म्हणाल्या कि सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे, मात्र ग्रामीण भागात विद्यार्थी अनेक समस्यांचा सामना करत आहेत, सगळेच विद्यार्थी, ऑनलाईन वर्गासाठी स्मार्ट फोन, टॅबलेट किवा कॉम्प्युटर घेऊ शकत नाहीत, आणि विद्यार्थी मानसिक दृष्टया या शिक्षणासाठी तयारही नाहीत, हातात पेन आणि वही असली कि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा सुरु होण्यापूर्वी वेगळाच आनंद असतो, त्या मुळे ज्या विभागात कोरोना संक्रमण नाही तिथे शाळा सुरु केल्या जातील वर्षा गायकवाड म्हणाल्या कि वातावरणात उष्णता असल्यामुळे विदर्भात नेहमी शाळा उशिरा सुरू होतात, पण कोरोना संक्रमण पाहता यावेळी विदर्भात आधी शाळा सुरू केल्या जातील, सध्याची परिस्थिती पाहता गायकवाड म्हणाल्या की, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विदर्भच्या चंद्रपुर, गोंदिया, भंडारा सारख्या जिल्ह्यात ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती, त्याची सुरुवात ही होणार होती,
मात्र राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय थोडाफार लांबणीवर टाकावा लागला आता काही दिवसातच इथे शाळा सुरू केल्या जातील, त्या म्हणाल्या विदर्भातले काही जिल्हे आदिवासी आणि दुर्गम आहेत, या भागात कोरोना चा प्रभाव कमी आहे. त्यामुळे इथे शाळा सुरू केल्या गेल्या होत्या मात्र केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा बंद कराव्या लागल्या, मात्र आता राज्याच्या अनेक भागात परिस्थिती सुधारत आहे. गायकवाड म्हणाल्या की,स्थानिक परिस्थिती पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, आदिवासी आणि दुर्गम भागातल्या शाळा आधी सुरू करण्यात येतील.