खासदार राजीव सातव यांच्यावर कळमनुरीत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : खासदार सातव यांच्यावर कळमनुरीत त्यांच्या घरासमोर शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले पालक मंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाराष्ट्र काॅग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासह गुजरात येथुन काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, विश्वजीत कदम ,अस्लम शेख, यांच्यासह अनेक मंत्रीगण उपस्थित होते अखेर चा निरोप देण्यात आला त्यांना काॅग्रेस नेत्या सोनिया गांधी,राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्यांच्या वतीने पुष्पचक्र वाहन्यात आले.. त्यांच्या पश्चात आई माजी मंत्री रजनी सातव धर्मपत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव दोन मुले असा परिवार आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी  कोरोनावर मात केल्यानंतर शनिवारी (दि. 15) पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याचे समजले होते.. त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात होती. सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली  होती. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू होते..

गेल्या महिन्यात खासदार सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर 10 मे रोजी त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घऱी सोडण्यात येणार होते. पण अचानक खासदार सातव यांची प्रकृती खालावली आणि त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला.. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल 16 मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली… सातव हे कॉंग्रेस नेेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. गेल्या वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी सातव यांची निवड झाली होती. 2014 साली सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

Social Media