जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतली कोरोनाची लस

घाबरून न जाता लस घ्या -जिल्हाधिकारी

ठाणे  : ठाणे जिल्हाचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज सिव्हिल हॉस्पिटल येथे करोना लसचा पहिला डोस घेतला. करोनाची लस घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी घाबरून न जाता लस घेण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले. तसेच जिल्ह्यात सुरू असणारे लसीकरण सुरळीत पार पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, उप विभागीय अधिकारी ( भिवंडी) डॉ मोहन नळदकर उपस्थित होते. १६ जानेवारी पासून करोना लसीकरण मोहीम जिल्हात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस अधिकारी कर्मचारी यांना लस देण्याचे काम सुरू असल्याचे  नार्वेकर यांनी सांगितले.तसेच आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी देखील लसचा पहिला डोस घेतला.

Social Media