मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना आणि फिटनेस प्रमाणपत्र यांची वैधता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयानुसार ज्यांच्या कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान समाप्त होणार आहे किंवा झाली आहे त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार आहे. हि कागदपत्र आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध धरली जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
Tag-Driving license/driving license/fitness certificate