दक्षिण मुंबईत पहिल्यांदाच तुंबली, पर्यावरण तज्ज्ञांचे ‘दोन’ मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टकडे बोट!

मुंबई : मागील दोन दिवसात मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्यांदाच दक्षिण मुंबई पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.  पर्यावरण आणि नगर रचना तज्ज्ञांच्या मते याला कारण भाजप सरकारच्या काळात मुंबईत मेट्रो आणि कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाचा विचार न करता सुरू केलेली कामे कारणीभूत आहेत. दक्षिण मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोड जबाबदार आहे.कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामामुळे दक्षिण मुंबई बुडाली का? असा सवाल पर्यावरण तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मुंबई मेट्रो प्रकल्प देखील याच भागात जमिनीखालून करण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईत कोस्टल रोडसोबतच मेट्रो 3 चे भुयारी मार्ग आहेत. या भुयारी मार्गाच्या कामासाठी जमिनीखाली काम सुरू आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई बुडण्याला कोस्टल रोड सोबत मेट्रो 3 चा प्रोजेक्टही जबाबदार आहेत  असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. पर्यावरण आणि नगर रचनाकारांच्या मते मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसराचे नियोजन ब्रिटीशांच्या मुळ नगर रचनेन नुसार असल्याने येथे कधीच पाणी तुंबत नाही मात्र ओव्हल मैदाना खालून मेट्रोचे भुयार गेल्याने जमिनीत मुरणारे पाणी तुंबले. तर मंत्रालय परिसरातून ओव्हल मैदानाच्या कडे जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया थांबली त्यावेळी मेट्रो आणि सागरी मार्गाच्या कामांमुळे पाणी जायचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत.

कोट्यावधी रूपये कर्ज काढून सुरू असलेल्या या कामांनायोग्य नियोजन न केल्याने भविष्यात कोणत्या भयानक पर्यावरणीय समस्या येवु शकतात याची ही चुणूक होती असे सांगितले जात आहे. मुंबईला 26 जुलै 2005 रोजी पुराचा फटका बसला होता. यात दक्षिण मुंबईत अरबी समुद्र असूनही 2005 मध्ये पुरात या ठिकाणी कुठेही पाणी कमी साचले नाही. त्या पुराचा या ठिकाणी फार कमी प्रमाणात फटका बसला. मात्र बुधवारी रात्रीच्या पावसाने उच्चभ्रू वस्ती असलेल्या दक्षिण मुंबईला चांगलेच झोडपले. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.पर्यावरण तज्ज्ञांच्या या प्रश्नांनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचले अस म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण पाऊस लक्षात घेऊनच कोस्टल रोडच्या सर्व मशिन इतरत्र हलवल्या होत्या. पूर्ण काळजी घेतली होती.” “समुद्राच्या पाणी हायटाईड आणि सुसाट वाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढली. कोस्टल रोडच्या बाबतीत पूर्ण काळजी घेतली आहे. शेवटी निसर्ग मोठा आहे,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Social Media