नागपुरातील दीक्षाभूमी येथे होणारा 64 वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिन सोहळा रद्द,पंचशील व बुध्दवंदना साधेपणाने घेण्यात येणार

नागपूर :  दरवर्षी प्रमाणे परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने दीक्षाभूमी नागपूर येथे 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धम्मपरिषद व मुख्य धम्मसोहळा रद्द करण्यात येत असल्याची माहिती परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ .सदानंद फुलझेले यांनी आज नागपूर येथे दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . पुढे ते म्हणाले 24 ऑक्टोबरला पंचशील ध्वजारोहण स्मारक समितीच्या सदस्याच्या उपस्थितीत होणार तसेच समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येणार. 25 ऑक्टोबरला अशोक विजयादशमी रोजी सकाळी 9 वाजता दिक्षाभूमीवर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजून सूरई ससाई यांच्या आणि स्मारक समितीच्या सदस्याच्या उपस्थितीत परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भीमवंदना व बुध्दवंदना घेण्यात येणार तसेच स्तूपाच्या आत मध्ये भन्ते आर्य नागार्जुन सूरई ससाई यांच्या तर्फे बुध्द वंदना घेण्यात येणार आहे.

त्या दिवशी सर्व बुध्द विहारात बुध्द वंदना घेण्यात यावी अशी विनंती स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. आपल्या घरीच धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा बुध्दवंदना घेवुन साजरा करावा असे आव्हान स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले. कोविड 19 मुळे म्रुत्युमुखी पडलेल्या नागरिकांना, डॉक्टर, स्वास्थ कर्मचाऱ्यांना, पोलिसांना सफाई कर्मचाऱ्यांना व कोरोना योध्याना श्रध्दांजली प्रीतर्थ व त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सामील होण्याच्या भावनेतून दिक्षाभूमी स्तूपावर कुठलीही रोषणाई न करण्याचा स्मारक समितीने निर्णय घेतला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळेला दिली .

Social Media