निशिकांत कामतच्या निधनाने एक उमदा दिग्दर्शक हरपला! : बाळासाहेब थोरात.

मुंबई : ‘डोंबिवली, फास्ट’, ‘लय भारी’, दृश्यम, मदारी, अशा दर्जेदार सिनेमांचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतच्या अकाली निधनाचे वृत्त मनाला चटका लावून गेले. अवघ्या ५० व्या वर्षी कामत यांनी जगाचा निरोप घेतला हे अजूनही मनाला पटत नाही. दर्जेदार चित्रपट देणाऱ्या निशिकांत कामतच्या जाण्याने चित्रपसृष्टीने एक उमदा दिग्दर्शक गमावला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

निशिकांत कामत हे यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, यातून ते लवकर बरे होतील अशी सर्वांना आशा होती पण आज संध्याकाळी त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘मदारी’, यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शन निशिकांत केले. निशिकांत कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष कामत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.

Social Media