मुंबई, दि. २७ : राज्य सरकारने पाच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून त्यानुसार राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर राजीव जलोटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे या पदावरील सचिव सौरभ विजय यांची बदली करण्यात आली असून त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन हा विभाग देण्यात आला आहे.
तर सध्या माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिवपदावर कार्यरत असणारे एस व्ही आर श्रीनिवास यांची बदली करण्यात आली असून यापुढे त्यांना मंत्रालयात गृहनिर्माण विभागात प्रधान सचिव पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. जलाज शर्मा यांची नियुक्ती नागपूर महापालिकेत आतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर करण्यात आली आहे.तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सध्याचे सचिव डॉ संजय मुखर्जी यांची बदली करण्यात आली असून त्यांना सांस्कृतिक कार्य विभाग सोपविण्यात आला आहे.