पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

पुणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. इटकरे गावानजीक रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. सांगली जिल्ह्यातील महामार्ग गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी मृत्यू पावलेला हा बिबट्या रस्ता दुभाजकाच्या जागेवर हलविला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत तो मृत्यू पावला असावा असा बहुसंख्य लोकांचा अंदाज आहे.

गेली काही दिवस हा बिबट्या इटकरे कामेरी गोटखिंडी या भागात वास्तव्यास होता.अनेक लोकांना तो पाहायलाही मिळाला. पण हा भाग डोंगराळ आणि ऊस क्षेत्राचा असल्याने बिबट्या लोकांच्या हाती लागणे कठीण होते. शेताकडे जाणाराना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले. पण त्याने कुणावरही हल्ला केला नव्हता. जानेवारी महिन्यात इटकरे परिसरात अनेकदा दिसलेला बिबट्या अचानक महामार्गावर मृतावस्थेत आढळला.

Tag-A leopard was killed in a collision with an unidentified vehicle on the Pune-Bangalore National Highway/पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

 

Social Media