पुन्हा एकदा मुख्यमंत्री दि बेस्ट; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ७ पैकी ६ भाजपेतर, ठाकरेंचा क्रमांक बिहारसोबत संयुक्तपणे टॉप फाईव्ह मध्ये!?

मुंबई,: देशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न इंडिया टुडेसमुहाने केला. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना  पहिली पसंती मिळाली. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या सातपैकी योगी आदित्यनाथ सोडले तर सहा मुख्यमंत्री हे भाजपेतर आहेत. देशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न इंडिया टुडेने सर्वक्षणाच्या माध्यमातून केला. यामध्ये 24 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योगायोगाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सोबत संयुक्तरित्या पाचव्या स्थानी आहेत. महत्वाचे म्हणजे भाजपचे रोल मॉडेल समजल्या जाणा-या गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे लोकप्रिया मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात तळाला आहेत. या यादीत योगींनंतर दुसऱ्या स्थानी १५ टक्के पसंतीसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. तर ११ टक्के पसंतीसह तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी आहेत. चौथ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (९ टक्के) आहेत. तर उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार हे ७ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकवर आहेत. या यादीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी या सर्वांना केवळ २ टक्के पसंती मिळाली.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी अशी आहे: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ – 24 टक्के, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल – 15 टक्के, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी – 11 टक्के, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी – 9 टक्के, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – 7 टक्के

Social Media