मुंबई : मुंबईच्या मानखुर्द भागात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स व आहार पुरवठादार बचतगटाच्या महिलांनी क्रांतीदिनाच्या पूर्वसंध्येला काळ्या फिती लावून व काळ्या ओढण्या फडकवून अनोखे आंदोलन केले. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, कोरोना सर्वेक्षण करणाऱ्या आशांना ३०० रुपये रोज याप्रमाणे भत्ता द्या. महागाई रोखा, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण करू नका. अशा मागण्या त्यांनी केल्या. संगीता कांबळे, सुहासिनी कानसे यांनी नेतृत्व केले.