मराठा आरक्षणासोबत मुस्लीम आरक्षणाचाही अध्यादेश काढा, काँग्रेसच्या माजी आमदाराची अशोक चव्हाणांना मागणी

मुंबई दि. मराठा आरक्षणाच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश देखील काढावा, अशी मागणी काँग्रेसचे मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याचा सल्ला सरकारला दिला. त्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचीही मागणी होत आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या ५ टक्के मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश देखील काढावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून याबाबतची मागणी केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजासह मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण २०१४च्या आदेशातच दिले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्षणामध्ये मुस्लीम समाजाला देण्यात आलेले आरक्षण कायम ठेवले होते. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबरोबर मुस्लीम आरक्षणाचाही विचार करत अध्यादेश काढावा अशी मागणी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली.

या मागणीचे एक पत्र मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण यांना पाठवण्यात आले आहे.मुस्लीम समाजातही नाराजी तयार होत आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारु लागले आहेत. त्यामुळे सरकारने दोन्ही आरक्षणाचे अध्यादेश सोबत काढून दोन्ही समाजाला न्याय द्यावा असे आसिफ यांनी म्हटले आहे.

Social Media