महाविकास आघाडी सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप सरकार : फडणविसांचे टिकास्त्र!

मुंबई दि. ३१ : महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे दुभंगलेले कुटुंब आहे. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे.’, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी माध्यमाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. सध्या महामारीचा काळ आहे, महामारीची लढाई सुरु आहे. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय. पण माझे ठाम मत आहे की देशाच्या पाठीवर असे सरकार कधीच चालत नाही. ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे कुटुंब आहे ते दुभंगलेलं आहे. याला कुटुंब म्हणूच शकत नाही. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल आणि ज्या दिवशी हे सरकार पडेल त्याचदिवशी आमच्यावर जबाबदारी आली तर आम्ही एक मजबूत सरकार महाराष्ट्राला देऊ.’ असे फडणवीस म्हणाले. 

ठाकरे सरकार लिव्ह इन रिलेशनशिपचे सरकार असेल तर तुम्ही अजित पवार यांच्याबरोबर स्थापन केलेल्या सरकारला काय म्हणाल? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तो एक फसलेला प्रयत्न होता. त्यामुळे त्याला कुठलेही नाव देता येणार नाही. फडणवीस म्हणाले. ‘सध्याचे सरकार म्हणजे एक ट्रेन आहे, अनेकदा ट्रेनला मागे इंजिन असते, एक पुढे असते, पण याला मध्येही एक इंजिन आहे. आणि तिघेही आपापल्या दिशेने ते इंजिन ओढत आहेत.’, असे ते म्हणाले.

Social Media