मुंबई : मुंबईत आज नवीन ७५३ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २९ हजार ४७९ झाली आहे. मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज ८३३ रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या १ लाख ४ हजार ३०१ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णाची संख्या १७ हजार ७०७ झाली आहे.
दुर्दैवाने आज ४० जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ७ हजार १७० झाली आहे. आज मृत्यू झालेल्यात २५ पुरुष व १५ महिला होत्या. तर २६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईत बरे झालेल्या रुग्णाचा दर आता ८० टक्के इतका झाला आहे . तर १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान कोविडवाढीचा दर हा ०. ८१ टक्के इतका आहे. १६ ऑगस्ट पर्यत एकूण ६ लाख ५६ हजार ६९० कॉविड च्या चाचण्या करण्यात आल्या , तर मुंबईतील रुग्णांचा दुपटीचा दर हा ८६ दिवस इतका झाला आहे.