मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फसवा : प्रभाकर शिंदे

मुंबई : मुंबईसारख्या  शहरावर ओढावलेल्या कोरोनाच्या महामारीच्या संकटानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीचा प्रोत्साहक  म्हणून आजच्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या नजरा लागल्या होत्या. आज सादर झालेल्या  अर्थसंकल्पावर  भाजपने जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प फसवा असून मुंबईकरांना केवळ स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. पालिकेत आज अर्थसंकल्प सादर करत मुंबईकरांना स्वप्न दाखवली. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी कुठून आणणार? असा सवाल देखील प्रभाकर शिंदे यांनी केला.

पालिकेच्या आयुक्तांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो फसवा आहे. हा अर्थसंकल्प केवळ विकासाची स्वप्न दाखवणारा आहे. विकास करण्यासाठी पैसे कुठून आणणार याचे प्रतिपादन केलं नाही. सरकारकडे जवळपास ५ हजार कोटी थकबाकी आहे ती कशी मिळवायची? हे या अर्थसंकल्पात सांगितलेलं नाही किंवा याबाबत स्थायी समितीने काही उपाय योजना केल्या नाहीत. हा अर्थसंकल्प आकड्यांची फिरवाफिरव करणारा अर्थसंकल्प आहे.असेही ते म्हणाले . कोरोनाच्या काळात देखील शिवसेना आपला फायदा बघत आहे. मुंबई शहराला काय दिल ते एकदा आम्हाला सांगावं, असा सवाल हि प्रभाकर शिंदे यांनी केला आहे .

Social Media