मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. कोरोना काळात ग्रामपंचायत निवडणुका घेता आल्या नाहीत त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा मुद्दा गाजला होता. त्यावर विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली होती.
या निवडणुका आता घेता येतील का याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. २१ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल ते जून 2020 कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे.