रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरेंना ओळखत नाही, रियाचे वकील सतीश मानशिंदे यांचा खुलासा!

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरेंना ओळखत नाही, असा खुलासा रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद सुरु असताना राज्याचे पर्यटनमंत्रीआदित्य ठाकरे यांनी  हस्तक्षेप केल्याचे सांगत त्यांचे नाव घेण्यात येत आहे.

मात्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरेंना ओळखत नाही, असा खुलासा रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी केला आहे. “रिया कधीही आदित्य ठाकरे यांना भेटली नाही. आदित्य हे राजकारणी आहेत, त्यामुळे ती त्यांना ओळखते. पण ती वैयक्तिक कधीही आदित्य ठाकरे यांना भेटली नाही, त्याचबरोबर ती त्यांच्याशी कधीही फोनवर बोललेली नाही”, असे स्पष्टीकरण रिया चक्रवर्तीच्या वतीने तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी केले आहे.

Social Media