मुंबई, : ईडी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहे. आतापर्यंत ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती 8 तास आणि तिचा भाऊ शोविकची 18 तास चौकशी केली आहे. आता ईडीने रिया आणि तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. आज (10 जुलै) तपास पूर्ण होईल.
सुशांतसिंह राजपूत यांच्या बँक खात्यासह मोठ्या आर्थिक व्यवहाराची देखील ईडीने चौकशी सुरू केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर 15 कोटींचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचीही चौकशी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून रिया आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.