लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विक्री करणाऱ्या तरुणाला अटक

मुंबई : कोवीड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विक्री करणाऱ्या तरुणाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली. सौरभ बजरंगी सिंग (वय१०) असे त्याचे नाव असून तो वसईपाडा रोड संतोष भुवन नालासोपारा येथिल रहिवाशी आहे.

सध्या भारतात व संपुर्ण जगभरात चालू असलेल्या कोरोना कोव्हीड -१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी लसीकरण केंद्रे सुरू केली आहे .लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय लोकल प्रवासाला मुभा नसल्याने अनेक जण
बोगस प्रमाणपत्र सादर करीत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर आहे. मात्र सौरभ सिंग याने लसीकरणाचा एकही डोस न घेता कोव्हिडंशील लसीचे २ डोस घेतल्याचे भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे बनावट बनावट प्रमाणपत्र देत होता .त्यासाठी तो प्रत्येकी ७०० रुपये घेत होता.

ठाण्यातील राबोडी येथील फजलुर रहेमान शेख या तरुणाला अशाच प्रकारचे कोव्हिडंशील लसीचे २ डोस घेतल्याचे बनावट बनावट प्रमाणपत्र बनवून दिले होते. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात कलम ४२० , ४६५ , ४६८ , ४७१ , २६ ९ २७० १८८ सह साथीचे रोग अधिनियम १८ ९ ७ चे कलम २ , ३ , ४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ ( क ) , ६६ ( ड ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .ठाणे खंडणी विरोधी पथकाने तपास करून या गुन्ह्यातील आरोपी सौरभ सिंग याला अटक केली. सौरभने अशा प्रकारे बऱ्याच लोकांना बनावट लसीकरणाची प्रमाणपत्रं बनवुन देवुन त्याबदल्यात १५ हजार रुपये स्वीकारल्याचे तपासात पुढे आले आहे .

Social Media