मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात व्यापक लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. अनेक केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असून नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. लसीकरण केंद्रातील गर्दीमुळे ही केन्द्र हॉटस्पॉट होतील की काय, अशी शंका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी व्यकत केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून, आज मुंबई, कल्याण, डोंबिवलीत लसीकरण केंद्रावर गर्दी होत असून भांडणाचे मोठे प्रकार दिसून आले. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नागरिकांना सांभाळता सांभाळता त्रेधातिरपीट उडत आहे. तसेच सोलापुर, औरंगाबाद, शिर्डी या ठिकाणी सुद्धा गर्दी होत असल्यामुळे राज्यसरकारने लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, टप्प्याटप्प्याने लसीकरण करावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.
मराठा समाजाला काय दिलासा देणार ?
What relief will the Maratha community give?
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधी पक्षाने एकमताने या कायद्याला मंजुरी दिली. परंतु आता कायदा रद्द केल्यानंतर तो कायदाच बरोबर नसल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून केली जात असून दुट्टपी भूमिका त्यांच्याकडन घेतली जात आहे. खरे तर सरकारने आरक्षण रद्द झाल्यानंतर पुढील नियोजन काय असेल याबाबत भाष्य करायला हवे, त्याऐवजी केंद्र सरकारकडे बोट दाखवत पंतप्रधान व राज्यपालांवर जबाबदारी सोपवून ते मोकळे होऊ पाहत आहेत असे दरेकर म्हणाले. मात्र आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याऐवजी राज्यसरकार म्हणून मराठा समाजाला आपण कसा दिलासा देणार आहात, असा सवाल दरेकर यांनी केला.
A massive vaccination drive has been launched in the state in the wake of increasing corona patients. Many centres are crowded with citizens and planning is in full swing. Legislative Council opposition leader Pravin Darekar has raised doubts whether the centre will become hotspots due to congestion at the vaccination centre.