लैंगिक छळाच्या आरोपांवरून अनुराग कश्यपचा बचाव करणारी अभिनेत्री तापसी पन्नू ट्रोलर्सच्या निशाण्यावर

मुंबई :  चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यानंतर अनुराग कश्यपचा बचाव करण्यासाठी तापसी पन्नूला जोरदार ट्रोल केले जात आहे. नेटिझन्सनी तापसीचे  जुने ट्विट्स शोधून काढले आहेत. नुकतीच एका अभिनेत्रीने चित्रपट निर्माते अनुराग कश्यपवर लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुराग कश्यपविरोधात कारवाई करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तर देताना अनुराग कश्यप यांनी या आरोपांना ‘निराधार’ म्हटले आहे.

त्यानंतर लवकरच ‘मनमर्जिया’, ‘साँड की आँख’ सारख्या चित्रपटात अनुरागबरोबर काम केलेल्या तापसी  पन्नूने अनुराग कश्यप यांचे समर्थन केले आणि सांगितले की ते सर्वात मोठे स्त्रीवादी आहेत. मात्र, तापसी ला  ट्विटरवर ट्रोल केले जात असून त्यांना ढोंगी असे म्हटले जात आहे. तापसी पन्नू हिनेतिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘तुझ्यासाठी, माझ्या मित्रा, तू मला माहित असलेला महान स्त्रीवादी आहेस. चित्रपटाच्या दुसर्‍या सेटवर लवकरच भेटू  ज्यात दर्शवले आहे की, तुमच्याद्वारे बनवलेल्या जगामध्ये महिला किती शक्तिशाली  आणि महत्वपूर्ण  आहेत.

यानंतर लगेचच ट्विटरवर लोकांनी तापसी च्या हॅशटॅग मी टू चळवळी दरम्यानचे जुने ट्विट्स शोधून काढले ज्यात तिने लोकांना हॅशटॅग मी टू च्या आरोपींची बाजू घेण्यापासून थांबण्यास सांगितले होते. चाहत्यांनी  रिया चक्रवर्ती समवेत एकता दाखवताना तिने समायिक केलेल्या पोस्टचा  संदर्भही दिला.

 

 

Social Media