लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करावा

मुख्यमंत्र्यांकडून वनकुटी व्ह्यू पॉईंटवरून सरोवराची पाहणी

बुलडाणा : लोणार सरोवर(Lonar Sarovar) हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ठाकरे यांनी आज लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला भेट दिली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली.

लोणार सरोवरात(Lonar Sarovar) जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका विकास कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार एकत्रितरीत्या करावा. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे याठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी.

Tag-A definite planning plan should be prepared for the development of Lonar Sarovar

Social Media