शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही : निवडणूक आयोग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याने खळबळ माजली होती. पण आता स्वत:  निवडणूक आयोगाकडूनच माहिती देण्यात आली आहे की पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही!. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन आयकर विभागाने शरद पवार यांच्या नावे नोटीस पाठवली होती असे वृत्त काही माध्यमांतून प्रसारीत झाले.

शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे त्यात म्हटले होते. याबाबत विचारणा केली असता पवार यांनी देखील मिश्किल शब्दात त्यांना विशेष प्रेम आले असावेअसे म्हटले होते. पण, निवडणूक आयोगाने असा कोणताही इशारा दिला नसल्याचे आता स्पष्ट केले आहे.२००९, २०१४ आणि २०१९या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे म्हटले होते. नोटीस आल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रियाही दिली होती.

‘सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंदच’, अशी खोचक टिप्पणी पवारांनी केली होती.

Social Media