सुशांतसिंह राजपूत यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार!?

मुंबई : सुशांतसिंह राजपूत यांचा नुकताच कॅलिफोर्निया असेंब्लीने गौरव केला. सुशांतला हा सन्मान त्यांच्या समाजात केलेल्या योगदानाबद्दल देण्यात आला. आता सुशांतला यंदा राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित केले जाऊ शकते. सरकार सुशांतच्या चित्रपटांचा उत्सव स्वतंत्रपणे आयोजित करू शकते अशीही चर्चा होत आहे. यानंतर सुशांतसिंह राजपूत यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाऊ शकते.

सुशांतचा मित्र गणेश म्हणतो की, सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीत बऱ्याच नामांकित सेलिब्रिटींचा सहभाग होता. पार्टीत बरेच काही घडले होते ज्याबद्दल सुशांतला सर्व काही माहित होते. या प्रकरणात संदीप नावाच्या व्यक्तीने गणेश हे नावही घेतले होते. ते म्हणाले की संदीपलाही बरेच काही माहित आहे.तथापि, सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी सुशांतच्या मृत्यूविषयी माहिती उशीर झाल्याचे सांगितले होते.

दुसरीकडे गणेश म्हणतो की, सुशांतला दिशा सॅलियनच्या मृत्यूबाबत काही रहस्य माहित होते. सुशांतला सर्व माहित झाले याची माहिती काही लोकांना झाली होती. गणेश म्हणतो की सुशांतने आत्महत्या केली ही माहिती चुकीची आहे. सुशांत आत्महत्या करणारा नव्हता. सुशांतबरोबर कुणी कट रचला होता आणि ते कोण होते या सर्वांची माहिती त्याला आहे असेही तो म्हणाला आहे आणि लवकरच नावे उघड करणार असल्याचेही तो बोलला. पोलिसांकडून संरक्षणाचीही मागणी गणेश ने केली आहे. विशेष म्हणजे सुशांतच्या मृत्यूनंतर काही दिवसानंतर पार्टीची चर्चा रंगली. पार्टीवरून विविध चर्चांना उधाण आले होते.

सुशांतच्या कुटुंबीयांनी पटना येथे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये गायब आहेत. वेगवेगळ्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले होते. तपास यंत्रणांनीही यासंदर्भात तपासाचा वेग वाढविला आहे. रिया चक्रवर्तीच्या बँक खात्याचीही चौकशी सुरू आहे. याशिवाय ईडी आणखी बऱ्याच लोकांच्या खात्यांची माहिती घेत आहे.
सुशांतच्या निकटवर्तीयांनी असा आरोप केला की, पोस्टमार्टम अहवालात मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नाही. शवविच्छेदन अहवालात हा उल्लेख केला जातो. मात्र यात वेळेचा उल्लेख का केला नाही, हा प्रश्नच आहे.

Social Media