सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआयच्या तपासाचे काय झाले : गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपासासाठी केंद्राकडून सीबीआयची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तो विषय मागे पडला आहे. सुशांतसिंह राजपूत हत्या की आत्महत्या या प्रकणाचा सखोल तपास व्हावा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आणि कंगना वादावर प्रश्न विचारला असता अनिल देशमुख म्हणाले, या विषयावर चर्चा केली जावी एवढा मोठा विषय नाही. त्यामुळे या पेक्षा अनेक मोठे विषय आहे. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा तपास चांगल्या प्रकारे केला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे असे काही मंडळीनी ठरवले आहे.

मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणात एफआयआर का देखील नाही, या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी कोणावरही संशय नाही असे लिहून दिले होते, मग गुन्हा कोणावर दाखल करायचा.’ शासनात काम करताना अनेकांना अशा गोष्टी होतात. पंतप्रधानांना देखील फोन आले आहेत. त्यामुळे धमकीचे फोन येणे यात काही मोठी गोष्ट नाही. मुंबईत ड्रग्जची कीड अनेक वर्षांपासूनची कीड आहे. सुशांतसिंह प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर होत आहे. त्यांची योग्य ती चौकशी होईल.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही देशातील मोठी संस्था आहे. याचे जाळे भारतभर आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे आहे. या संदर्भात खोलवर चौकशी केली पाहिजे. पोलीस भरतीवर देशमुख म्हणाले, राज्यातील सर्वात मोठ्या भरतीचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. आर्थिक टंचाई असताना देखील पोलिसांच्या घरांसाठी ७०० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पोलिसांच्या प्रश्नावर सरकार काम करत आहे.

Social Media