परळी : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या (Nagar-Beed-Parli railway line)कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे(Pankajatai Munde) यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी मंजूर केले,कामाला आणखी गती येणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,रेल्वेमंत्री पियुष गोयल(Piyush Goyal) यांचे आभार” असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने 100 कोटी रूपये मंजूर केले.. कामाला आणखी गती येणार. मा. @narendramodi जी व रेल्वेमंत्री मा. @PiyushGoyal जी यांचे खूप खूप आभार..!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 2, 2021
बीडकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र सरकार देखील निधीची पूर्तता करत आहे,केंद्र सरकारने केलेल्या शंभर कोटींच्या तरतुदीमुळे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंडे भगिनी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत.तसेच रेल्वेमार्गाच्या कामामध्ये त्या जातीने लक्ष देऊन आहेत.जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाकडून आढावा घेणे असो किंवा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे असो पंकजाताई आणि प्रितमताईंच्या तत्परतेमुळे रेल्वेमार्गाला गती मिळत आहे.परंतु हा रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने देखील त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
The Central Government has sanctioned a fund of Rs 100 crore to boost the work on the Nagar-Beed-Parli railway line. BJP national secretary Pankajatai Munde tweeted in this regard. The Central government has sanctioned 100 crore rupees for ahmednagar-beed-parli railway line, work will be further expedited. Thank you Prime Minister Narendra Modi, Railway Minister Piyush Goyal” he said in a tweet.
कोरोना काळातील आंदोलने सरकार का रोखू शकत नाही, उच्च न्यायालयाचे खडे बोल –
कोरोना काळातील आंदोलने सरकार का रोखू शकत नाही, उच्च न्यायालयाचे खडे बोल
ईडीच्या निमित्ताने अधिवेशनात सत्ताधारी आघाडीवर भाजपकडून दबाव! –
वर्षा बंगल्यावर शरद पवारांची विश्वासु मंत्र्यासह मुख्यमंत्र्यांशी खलबते !