म्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात म्यूकर मायकोसिस या रोगामुळे ९० जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिससाठी(muker mycosis) पुढचे १० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या अंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांचे उपचार केले जाणार आहेत.

८५० रूग्ण सक्रिय ( 850 patients active)

कोरोना पाठोपाठ महाराष्ट्राला या बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यात सध्या पधराशेपेक्षा जास्त म्युकरमायकोसिसचे रूग्ण आहेत. त्यातील ८५० रूग्ण सक्रिय आहेत. या संदर्भातले इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे. साधारणतः दोन लाख इंजेक्शन्स लागणार आहेत. ते ३१ मेनंतर मिळणार आहेत त्यामुळे हे १० दिवस महत्त्वाचे आहेत असेही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.महाराष्ट्रात आत्तापर्यंत या रोगामुळे ९० जणांचा मृत्यू झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या अंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांचे उपचार केले जाणार आहेत.

उपचार महागडे( Treatment expensive)

आरोग्यमंत्री म्हणाले की, कोरोनामध्ये ज्यांच्या रक्तातली साखर वाढली आहे त्यांना म्युकर मायकोसिस होण्याची शक्यता जास्त आहे. या संदर्भातले उपचार करावे लागत आहेत ती मोठी प्रक्रिया आहे. प्लास्टिक सर्जन, न्युरो सर्जन, डेंटिस्ट या सगळ्यांची गरज या आजारावर उपचार करण्यासाठी गरज लागते आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या अंतर्गत एक हजार रूग्णालये आहेत त्यातल्या किती रूग्णालयांमध्ये उपचार होत आहेत ते आम्ही पाहतो आहोत. या आजारावर इंजेक्शन एम्फोटेरेसमेन बी हे आहे. ते खूप महाग आहे. ते खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी रूग्णालये आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रूग्णालयांनाही ही इंजेक्शन्स दिली जाणार आहेत.

दीड लाख इंजेक्शन्स आवश्यक( 1.5 lakh injections required)

एका व्यक्तीला शंभर इंजेक्शन द्यायची झाल्यास सध्या दीड लाख इंजेक्शन्स मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून ती इंजेक्शन्स ही लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे. १५ ते १६ हजार इंजेक्शन्स मिळाली आहेत. ती आम्ही वाटली आहेत. याबाबत गुरूवारी पंतप्रधानांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. महाराष्ट्रातल्या १७ जिल्ह्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. त्यावेळी या रोगाचं गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi) यांनाही सांगितले जाणार आहे. तसेच लवकरात लवकर इंजेक्शन्स उपलब्ध करून द्या हे आम्ही त्यांना सांगणार आहोत असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

90 people have died due to the disease of muker mycosis in the state. Health minister Rajesh Tope has informed that the next 10 days are very important for mukker mycosis. He said all ration card holders will be treated under mahatma jyotirao phule scheme.

हे सुद्धा वाचा…शरीराला फिट ठेवायचे आहे तर यकृताची घ्या अशी काळजी…

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी यकृताचे तंदूरूस्त असणे आवश्यक!

Social Media