‘पहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलना’ चे आयोजन 

नागपूर :   मराठीच्या संवर्धनार्थ गेले कित्येक वर्ष आपल आयुष्य वांग्मयीन संस्कृतीची जोपासना करण्याकरता घालवणाऱ्या विदर्भातल्या काही प्रतिभावंत लेखक, कवी,कवयित्रींनी एकत्रित येऊन  मुहूर्तमेढ रोवलेल्या मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान ,नागपूर या  संस्थेने आजवर अनेक साहित्यिक उपक्रम राबविले. त्याचेच पुढचे धाडसी पाऊल म्हणजे श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित धनवटे नॅशनल कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले पहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन होय.

डॉ.पंजाबराव देशमुख साहित्यनगरीत मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज,कॉंग्रेसनगर  येथे दिनांक 17 व 18 एप्रिल 2022 रोजी आयोजित या साहित्य संमेलनाचे उदघाटन  हर्षवर्धन देशमुख ,माजी कृषिमंत्री यांच्या शुभ हस्ते होणार असून या साहित्य संमेलनाला 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल मोहन सबनीस हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.  जळगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.वा. ना. आंधळे तसेच अमरावती येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. शोभा ताई रोकडे  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी  हेमंत काळमेघ यांनी स्विकारलेली आहे.

उदघाटन सत्रात
विजयाचे अभंग- (विजया मारोतकर),
आर्तकथांची सार्थकता (चरणदास वैरागडे),
आनंदघन  (आनंदी चौधरी),
बालनाट्य संग्रह (मंगेश बावसे),
ठाव (अरुणा कडू),
गंधाळल्या स्वप्नकोषी (पल्लवी उमरे), पोरी जरा जपून – दूसरी आवृत्ती (विजया मारोतकर)
इत्यादी साहित्य कृतींचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार आहे. प्रकाशन समारंभ सत्र विकास गजापूरे पाहणार आहेत. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन मंगेश बावसे करणार असून आभार प्रदर्शन विशाल देवतळे करणार आहेत.

“कोरोना नंतरच्या आव्हानात्मक काळात मराठीच्या संवर्धनार्थ साहित्यिकांची भूमिका
या विषयावर आयोजित पहिल्या परिसंवादाचे अध्यक्ष पद नाथे पब्लिकेशनचे संचालक तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक संजय नाथे भूषविणार असून डॉ.मंदा नांदुरकर ,अमरावती, डॉ. अरुंधती वैद्य, नागपूर, मा. मिलिंद रंगारी ,गोंदिया ,डॉ.गणेश चव्हाण, नागपूर यांचा यात  सहभाग असणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन  गोविंद सालपे करणार असून आभार प्रदर्शन डॉ. पद्मिनी गोसेकर करणार आहेत. यानंतर या साहित्य संमेलनाची धुरा समर्थपणे खांद्यावर आपल्या  घेऊन चालणाऱ्या प्रा. विजया मारोतकर यांच्यासह विशाल देवतळे ,मंगेश बावसे, मंजुषा कौटकर यांचा सहभाग असलेलेअभिरूप न्यायालय सत्र साकार होणार आहे. या
सत्राचे सूत्रसंचालन माया दुबळे मानकर करणार असून आभार पल्लवी उमरे मानणार आहेत.

दुर्गेश सोनार, सुप्रसिद्ध कवी, सहाय्यक संपादक, लोकमत ,मुंबई यांच्या अध्यक्षतेत संपन्न होत असलेल्या  निमंत्रित कवींच्या कविसंमेलनास अकोला येथील सुप्रसिद्ध गझलकार देविकाताई देशमुख तसेच धामणगाव रेल्वे येथील सुप्रसिद्ध कवी डॉ.सुखदेव
ढाणके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.या सत्रात राज्यभरातील निमंत्रित कवी  नितीन देशमुख चांदूरबाजार, अनंत राऊत, पुणे ,हबीब भंडारे ,औरंगाबाद ,तीर्थराज कापगते, नागपूर ,सुरेखा कटारिया, पुणे ,वनश्री पाटील, जालना ,प्रियंका गिरी, दर्यापूर, अशोक कुबडे, नांदेड, स्वाती सुरंगळीकर ,नागपूर, माधुरी चौधरी, औरंगाबाद, विशाल इंगोले,लोणार, कविता पुदाले, उस्मानाबाद ,कुसुम अलाम,गडचिरोली ,निशा डांगे पुसद  या कवींच्या दमदार कविता सादर होऊन अनेक विषयांचा ऊहापोह होणार आहे. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या कवियत्री अरुणा कडू व कोकिळा खोदनकर करणार असून आभार प्रदर्शन डॉ. संगीता रेंगे करणार आहेत.

सायंकाळी साडेसहा वाजता सादर होणाऱ्या सांस्कृतिक सादरीकरण या सत्राच्या संयोजनाची धुरा मंगेश  बावसे, कीर्ती लंगडे, अर्चना धवड यांनी स्वीकारलेली असून पल्लवी उमरे, निमा बोडखे, वैशाली कोल्हे गावंडे, लीना भुसारी खैरकर ,डॉ. अरविंद बुटले, अस्मिता बागडे, प्रणाली देशमुख, अनिता शिंदे, मयुरी ठाकरे, डॉ. विना राऊत, वैशाली मालोदे, प्रा. नितीन कराळे, डॉ.राजकुमार गोसावी, प्रा. रोशनी गतफणे आपला कलाविष्कार सादर करणार आहेत.

दि.18एप्रिल रोजी सकाळी  नऊ वाजता माजलगाव ,बीड येथील मा. स्नेहलताई पाठक यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या कथाकथन सदरात सप्तर्षी माळी ,नाशिक, संघमित्रा खंडारे, दर्यापूर, संध्या महाजन, जळगाव ,अनंत ढोले ,नागपूर हे कथाकार आपल्या कथांचे कथन सादर करणार आहेत,जी श्रोत्यां करता एक पर्वणीच असेल. सतरा चे सूत्रसंचालन आनंदी चौधरी करणार असून आभार माधव शोभणे मानणार आहेत.

उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेत संपन्न होत असलेल्या “पुरुषांच्या जगात स्त्रीचे जगणे” या विषयावरील परिसंवादात
प्रवीण जोंधळे ,नाशिक,
विजया ब्राह्मणकर, नागपूर,
डॉ. राजेंद्र वाटाणे ,नागपूर,
डॉ. ममता इंगोले, अकोला,
संध्या राजूरकर ,नागपूर
हे सहभागी होत आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन मंदा खंडारे करणार असून ज्योती बनसोड आभार मानणार आहेत.

“नक्षत्रांचे देणे” या कवी संमेलनाचे अध्यक्ष स्थानी जळगाव येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. बी. एन. चौधरी राहणार असून गोवा येथील सुप्रसिद्ध कवयित्री प्रिया कालिका बापट तसेच नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी विजयकुमार मीठे आणि डॉ. भारती खापेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कवी संमेलनामध्ये उल्हास मनोहर, माया नरसापूरकर, जीवन राजकारणे, विनय पाटील ,अंजुमन शेख ,माधव शोभणे, डॉ.संगीता जीवनकर, नीता अल्लेवार, विजय बेले, डॉ. अंजली टाकळीकर, शीतल कांडलकर, वैशाली मुलमुले ,चरणदास वैरागडे, उषा राऊत, स्मिता किडीले, श्रद्धा बुरले, धीरज पाटील, सविता झाडे पिसे, प्रभाकर तांडेकर, ज्योती बनसोड, डॉ. राजेश काळे ,डॉ.समिधा चव्हाण, मंजुषा किंजवडेकर ,अरूणा डांगोरे, ज्योत्स्ना कदम, राजेश कुबडे, रजनी रायकर  डॉ. सुनंदा जुलमे, डॉ. संगीता रेंगे, विकास गजापुरे, जयश्री घोडके, डॉ. पद्मिनी घोसेकर यांचा सहभाग राहणार असून या सत्राचे सूत्रसंचालन भूपेश नेतनराव व उज्‍वला इंगळे करणार आहेत तर  आभार प्रदर्शन राजश्री कुलकर्णी करणार आहेत.

डॉ. शरद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेत  समारोप सत्र संपन्न होणार असून याप्रसंगी नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला, सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉ.रवींद्र शोभणे, नागपूर विद्यापीठाचे मराठीचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रेय वाटमोडे, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणार्या प्रथम राज्यस्तरीय पुरस्काराकरिता नाशिक येथील विजयकुमार मिठे यांची निवड झाली असून  त्यांना हा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये डॉ. सुरेश खोंडे  आशाताई पांडे, अरुणाताई सबाने, डॉ, स्मिताताई वंजारी, मनोज बालपांडे, वैशालीताई कोहळे  यांचा त्यांच्या सामाजिक तसेच साहित्यिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या साहित्य संमेलनाच्या यशस्वितेकरिता सहकार्य करणारे काही व्यक्तिमत्व मनीषाताई यमसनवार ,गोपाल कडूकर,महावीर गडेकर, डॉ.प्रीती उमाठे ,संगीता महल्ले
यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. समारोप सत्राचे सूत्रसंचालन अरुणा भोंडे करणार असून आभार प्रदर्शन विजया मारोतकर करणार आहेत.

संमेलन सर्वांसाठी खुले असून,  सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करुन उपस्थित राहावे,असे आवाहन विजया मारोतकर,विशाल देवतळे, प्राचार्य जे.डी. वडते, डॉ. भारती खापेकर,
अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान ने अनेक दर्जेदार कार्यक्रम देऊन पहिलेच आपल्या नावाचा ठसा साहित्य जगतात उमटवला आहे.त्या पार्श्वभूमीवर
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाकडे
बघितले जात आहे.


या ‘बी पक्ष’ च्या ‘बि’रुदावलीत सारेच गुंतले; तरी भाजपचे काम ‘बि’ घडले ते ‘बि’घडलेच!

‘सत्तातुरांणा न भयं न लज्जा,’ सत्तेच्या साठमारीत सामान्यांचा जीव गुदमरला!

Social Media